ट्रकच्या धडकेत रेमण्डचा तरुण कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:08 IST2019-02-10T23:02:59+5:302019-02-10T23:08:14+5:30
दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयसमोर झाला. तुषार हा रेमण्ड कंपनीत फिटर म्हणून कामाला होता.

ट्रकच्या धडकेत रेमण्डचा तरुण कर्मचारी ठार
जळगाव : दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयसमोर झाला. तुषार हा रेमण्ड कंपनीत फिटर म्हणून कामाला होता.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुषार पाटील व दिलीप पाटील हे दोन्ही जण रविवारी सायंकाळी दुचाकीने भुसावळकडे जात असताना गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयाच्यासमोर भुसावळकडून येणाºया ट्रकने दुचाकीला धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने तुषार जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर दोघांना जवळील गोदावरी महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तुषारला मृत घोषीत केले. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रात्री मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
तुषारच्या वडीलांचेही याआधी निधन
तुषार पाटील याचे वडील भागवत किसन पाटील यांचे २०११ मध्ये निधन झाले आहे. २०१२ पासून तो रेमण्ड कंपनीत कामाला होता. लहान भाऊ मुकेश हा देखील खासगी काम करतो. आई निर्मला गृहीणी असून बहिण उज्ज्वला नेहते ही विवाहित असून भुसावळ येथे दिलेली आहे. तुषार अविवाहित होता. दिलीप हा त्याचा जीवलग मित्र होता, दोन्ही कुठे जात होते ही माहिती समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेमण्ड कामगार व खेडी खुर्द येथील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.