रावेर, जि.जळगाव : येथील व्ही.एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन. मुक्टो. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा .एम.एस. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.केंद्रीय संघटनेच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार द्वैवार्षिक निवडणूक झाली. पुढील नूतन कार्यकारीचे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी प्रा.सी.पी.गाढे, सचिवपदी प्रा.एस.डी. धापसे, सहसचिवपदी प्रा.एन.ए. घुले, खजिनदारपदी डॉ.ए.एन. सोनार, तर केंद्रीय प्रतिनिधी म्हणून डॉ.ए.जी.पाटील, तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रा.एस.बी. धनले यांची अविरोध निवड झाली.संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रा.डॉ.जी.आर. ढोंबरे यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून सर्व सभासदांनी निवडणूक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सचिव डॉ.एस.जी. चिंचोरे यांनी गेल्या दोन वर्षांचा अहवाल सादर केला.ज्येष्ठ सहकारी प्रा.जे.एम. पाटील, प्रा.डॉ.ए.जी. पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.व्ही.बी. सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
रावेर नाईक कॉलेज एन. मुक्टो कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:17 IST