रतनलाल बाफना यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 19:52 IST2020-11-17T19:50:55+5:302020-11-17T19:52:37+5:30
जळगाव : शाकाहाराचे प्रणेते व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक रतनलाल चुनीलाल बाफना यांचे सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन ...

रतनलाल बाफना यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
जळगाव : शाकाहाराचे प्रणेते व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक रतनलाल चुनीलाल बाफना यांचे सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. शहरातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी ५ वाजता कुसुंबा येथील गोशाळेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातू जैविक यांच्यासह पुत्र सुशील, सिद्धार्थ यांनी अग्नी डाग दिला.