चंदू अण्णा नगरात दुर्मिळ मांजऱ्या साप आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:59+5:302021-09-11T04:18:59+5:30
११सीटीआर ५४ मांजऱ्या लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चंदू अण्णा नगरात एका झाडामध्ये दुर्मिळ असा मांजऱ्या जातीचा सर्प आढळून ...

चंदू अण्णा नगरात दुर्मिळ मांजऱ्या साप आढळला
११सीटीआर ५४ मांजऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चंदू अण्णा नगरात एका झाडामध्ये दुर्मिळ असा मांजऱ्या जातीचा सर्प आढळून आला आहे. या परिसरातील नागरिकांनी हा सर्प लपून बसल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य दुर्गेश आंबेकर यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तिथे मांजऱ्या जातीचा निमविषारी सर्प आढळून आला. त्यांनी त्याला सुरक्षितरित्या पकडून स्थानिकांना त्याबद्दल माहिती दिली.
मांजऱ्या प्रजातीचा सर्प हा निमविषारी असून हे विष इतर विषारी सर्पापेक्षा थोडे सौम्य असते. त्या विषापासून मानवाला जीवितहानीचा धोका नसतो. या सापाचे डोळे हे मांजरा सारखे दिसत असल्याने त्याला मांजऱ्या सर्प हे नाव पडले आहे, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. या सर्पाची वनविभागकडे नोंद करून वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र दुर्गेश आंबेकर, नीलेश ढाके आणि ऋषिकेश राजपूत यांनी सुरक्षित स्थळी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.