Rapid Action Force calls for immersion procession in Jalgaon | जळगावात विसर्जन मिरवणुकीसाठी प्रथमच मागविली रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स
जळगावात विसर्जन मिरवणुकीसाठी प्रथमच मागविली रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स

जळगाव : लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवार, १२ रोजी भाविकांकडून भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गुरुवारी जिल्ह्यात जवळपास १५२९ मंडळांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन होईल.   यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला  आहे तर  विसर्जन मार्गावर ५२ ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
 सकाळी ९.४५ वाजता कोर्ट चौकात  मान्यवरांच्या उपस्थितीत आरती होईल.  यानंतर  सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणुकीत अग्रभागी मनपाचा मानाचा गणपती असेल. यंदा जिल्ह्यात २ हजार ३२१ मंडळाकडून ‘श्री’ंची स्थापना झाली होती. त्यापैकी १७० मंडळांकडून पाचव्या दिवशी विसर्जन झाले.   १४१ गावात ‘एक गाव एक गणपती’  उपक्रम राबविण्यात आला.
मिरवणुकीदरम्यान रात्री ८  वाजता एकाच वेळेस विसर्जन मार्गावर श्रींची निरोपाची महाआरती करण्यात येणार आहे.  यासाठी मंडळे रात्री ८ वाजता जेथे असतील तेथे महाआरती करतील. 
 मिरवणुकीसाठी जवळपास तीन हजार पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या १८०० जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी दोन हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या मेहरुण तलावावर फ्लड लार्इंटस्, तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Rapid Action Force calls for immersion procession in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.