लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:39 IST2019-11-06T21:39:12+5:302019-11-06T21:39:45+5:30
नगरच्या संशयितास अटक : विवाह नोंदणी वेबसाईटवर झाली ओळख

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून वेळावेळी २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात सचिन रावसाहेब इंगळे (२७, रा.शेवगाव जि.अहमदनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी शेवगाव येथून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मुळ चोपडा तालुक्यातील रहिवाशी असून २०१४ मध्ये जळगाव शहरात एका महाविद्यालयात एमसीएमचे शिक्षण घेण्यासाठी शहरात वास्तव्याला होती. त्याकाळात तिने विवाहसाठी विवाह नोंदणी वेबसाईटवर आॅनलाईन नोंदणी केली. तेव्हा सचिन इंगळे हा तरुण संपर्कात आला. दोघांमध्ये ओळख वाढल्याने फोनवर बोलणे होऊ लागले. त्यानंतर २०१५ मध्ये तो जळगाव शहरात तरुणीला भेटण्यासाठी आला होता.
कालिंका माता चौक परिसरातील साई लॉजवर नेऊन त्याने लग्नाचे कारण सांगून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी पीडितेला घेऊन तो गावाला घेऊन गेला व तेथे त्याच्या आई, वडीलांची भेट घालून दिली. त्यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता दोघांनी त्यास होकार दिला.
२०१९ या वर्षात सचिन याने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेतली. दोन महिन्याच्या काळातही त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.त्यातून पीडित गर्भवती राहिली. पुन्हा एकदा सोनोग्राफी केली असता त्यातही निष्पन्न झाले. पीडितेने गर्भपातास नकार दिला असता सचिन याने प्रतिभा हॉस्पिटल येथे दाखल करुन तेथे खोटे मंगळसूत्र घातले. तेथे गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. त्यामुळे पीडिता बेशुध्द झाली. या प्रकारानंतर त्याने थेट लग्नालाच नकार दिला व शेवगाव येथे निघून गेला. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.संशयिताच्या अटकेसाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर व पंकज सापकर यांचे पथक नेमले होते. या पथकाने बुधवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.