शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला डांबून ठेवून उकळली दीड लाखाची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:05 IST

दोन महिलांविरुध्द गुन्हा दाखल : प्रेयसी व प्रियकराच्या वडीलांना धमक्या

जळगाव: प्रेयसी व प्रियकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांच्या पालकांकडून १ लाख ५५ हजाराची खंडणी उकळल्याप्रकरणी वंदना भगवान पाटील (रा.राजपूत कॉलनी, हरिविठ्ठल नगर) व रेखा सुभाष पाटील (रा.आरएमएस कॉलनी) या तथाकथिक महिला समाजसेविकांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेत या समाजसेविकेंनी प्रेयसीला तब्बल दहा दिवस घरात डांबून ठेवले होते.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १९ वर्षीय तरुणीचे सोबतच शिक्षण घेत असलेल्या तरुणाशी प्रेमप्रकरण सुरु होते. काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्याने      प्रियकराने पे्रयसीशी बोलणे बंद केले. तिच्या फोनलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे तरुणीने १५ मे रोजी समाजसेविका रेखा पाटील व वंदना पाटील यांच्याकडे जाऊन प्रेमप्रकरणाची माहिती दिली.त्यानंतर १६ मे रोजी तरुणी रेखा पाटील यांच्या घरी गेली असता या दोन्ही महिलांनी तरुणीची एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली.त्यानंतर तिघे जण रामानंद पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज दिला. या ठिकाणी प्रियकर व त्याच्या वडिलांना बोलवून वाद मिटविण्यात आला.त्यानंतर रेखा पाटील यांनी तुझा प्रियकर तुझ्याशी लग्न करण्यास नाही म्हणतो,त्याला आम्ही पाहतो,असे तरुणीला सांगून महीलानी तिला सोबत त्यांच्या घरी नेले. या कामासाठी आम्ही शुल्क घेतो असे सांगून तरुणीकडे ५५ हजार रुपयांची मागणी केली. प्रकरण संवेदनशील असल्याने तरुणीने हा विषय वडीलांना सांगितला. त्यानंतर वडीलांनी दुसºया दिवशी ५५ हजार रुपये वंदना व रेखा पाटील यांना रेखा पाटील हिच्या घरी दिले.दरम्यान, २६ मे पर्यंत तरुणीला रेखा पाटील हिने स्वत:च्या घरातच डांबून ठेवले. या काळात त्यांनी तरुणीचा कोणाशीही संपर्क होऊ दिला नाही. उलट दम भरण्याचे काम केले. प्रियकराच्या वडीलांकडून घेतले १ लाखतरुणीने २६ रोजी रेखा पाटील हिची नजर चुकवून घर गाठले. प्रियकर व प्रेयसी दोघांमधील वाद न मिटल्याने प्रेयसीने गैरसमज दूर करण्यासाठी प्रियकराच्या वडीलांची भेट घेतली असता रेखा व वंदना पाटील यांनी प्रियकराच्या वडीलांना गाठून २ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली व त्यातील १ लाख रुपये घेतले देखील. उर्वरित १ लाख ७० हजार रुपये नंतर देण्याचे ठरले असे समजले. प्रियकर व प्रेयसीच्या भांडणाचा गैरफायदा घेत दोघांच्या पालकांकडून समाजसेविकांनी १ लाख ५५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचे बिंग फुटले. त्यामुळे प्रेयसीने शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून खंडणीची तक्रार दिली. त्यावरुन तथाकथित समाजसेविकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव