रांगोळीतही डोकावतोय सोशल मीडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 14:56 IST2020-11-16T14:53:03+5:302020-11-16T14:56:01+5:30

रांगोळी लक्ष वेधून घेत आहे.

Rangoli is also peeping social media | रांगोळीतही डोकावतोय सोशल मीडिया

रांगोळीतही डोकावतोय सोशल मीडिया

ठळक मुद्देअमळनेरला महिलेने काढलेली रांगोळी ठरतेय आकर्षणललिता जैन यांची रांगोळीतील कल्पकता


दिगंबर महाले
अमळनेर, जि.जळगाव : सध्या सोशल मीडियाने सारे जगच व्यापून टाकले आहे. व्हाट्सएप, इमोजी व स्माईलिचा दैनंदिन जीवनातील सर्वच क्षेत्रात सर्रास वापर होतोय. त्याला जाहिरात, सण - उत्सव, मेहंदी व रांगोळीचाही अपवाद राहिलेला नाही.
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाचे निवृत्त प्रभारी प्राचार्य तथा चिटणीस प्रा. ए. एम. जैन यांच्या उद्योजिका पत्नी ललिता जैन यांनी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या दारी काढलेल्या रांगोळीत स्माईलिचा कल्पकतेने वापर करून रांगोळी खुलविली आहे.

Web Title: Rangoli is also peeping social media