जळगावातील रामेश्वर कॉलनीत विष पाजून विवाहितेला ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:16 IST2018-09-22T13:13:58+5:302018-09-22T13:16:19+5:30
नवरा व सास-याने सोनिया कमलाकर पाटील (वय ३२) या विवाहितेला रात्री विष पाजून ठार मारल्याची संतापजनक घटना रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी नगरात घडली.दरम्यान, या घटनेपूर्वी सोनिया हिने चिठ्ठी लिहून ठेवल्याने या घटनेचा उलगडा झाला.

जळगावातील रामेश्वर कॉलनीत विष पाजून विवाहितेला ठार मारले
जळगाव : नवरा व सास-याने सोनिया कमलाकर पाटील (वय ३२) या विवाहितेला रात्री विष पाजून ठार मारल्याची संतापजनक घटना रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी नगरात घडली.दरम्यान, या घटनेपूर्वी सोनिया हिने चिठ्ठी लिहून ठेवल्याने या घटनेचा उलगडा झाला.
दरम्यान, सोनिया हिला शनिवारी सकाळी सहा वाजता खासगी रुग्णालयात आणणण्यात आले होते. तेथे दहा मिनिटातच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताचमाहेरच्या लोकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. पोलिसांनी नवरा कलमाकर, सासु आशाबाई व सासरा गोविंद या तिघांना ताब्यात घेतले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नांद्रा,ता.जळगाव येथील खुशाल श्यामराव पाटील यांची मोठी मुलगी सोनिया हिचा विवाह रामेश्वर कॉलनीतील कमलाकर गोविंद पाटील याच्याशी १४ वर्षापूर्वी झाला होता. कमलाकर हा नाशिक येथे महिंद्रा अॅँड महिंद्रा या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. गणपतीसाठी कमलाकर, पती सोनिया, मुलगा दर्शन(वय १०) व मुलगी पलक (वय ८) हे रामेश्वर कॉलनीत घरी आले होते. शुक्रवारी रात्री सासरा गोविंद व नवरा या दोघांनी सोनिया हिला विष पाजले. सकाळी साडे सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला.