राम मंदिर हे राष्ट्र मंदिर उभारणीचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:01+5:302021-02-05T05:55:01+5:30

नशिराबादला आर्थिक समर्पण योगदानाचे आवाहन नशिराबाद : अयोध्या येथील राम मंदिरासाठी जळगाव ग्रामीण तालुका निधी संकलन समर्पण कार्यालयाचे ...

Ram Mandir is the work of building a Rashtra Mandir | राम मंदिर हे राष्ट्र मंदिर उभारणीचे कार्य

राम मंदिर हे राष्ट्र मंदिर उभारणीचे कार्य

नशिराबादला आर्थिक समर्पण योगदानाचे आवाहन

नशिराबाद : अयोध्या येथील राम मंदिरासाठी जळगाव ग्रामीण तालुका निधी संकलन समर्पण कार्यालयाचे उद्घाटन फैजपूर येथील महामंडलेश्‍वर जनार्दन हरी स्वामी महाराज यांच्या हस्ते नशिराबाद येथे झाले.

व्यासपीठावर कानळदा येथील स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज, सावखेडा येथील महंत रजनीशपुरी महाराज, नंदगाव येथील योगगुरु जितेंद्र शुक्ला महाराज, रा.स्व.संघाचे तालुका संघचालक डॉ.भोजराज सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, श्याम कुमावत यांची प्रमुख उपस्थिती होती. रामू धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

उद्घाटनप्रसंगी सव्वा लाखांचा निधी संकलित झाला. सुरुवातीला मान्यवर व साधुसंतयांच्याहस्ते दीपप्रज्वलन व श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुनील शास्त्री महाराज, प्रभाकर महाराज, माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, प्रदीप बोढरे, नंदू नाईक, राजू वाणी, गणेश चव्हाण उपस्थित होते.

रमेश शर्मा, संजय कुलकर्णी, रवींद्र महाजन, मुकेश कोळी, रिद्धेश कौण्डिन्य, अक्षय सोनार, नीरज चितोडे, राहुल चौधरी, नरेंद्र धर्माधिकारी, रोहित कोलते, अमेय नाईक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, रामभक्त, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यात विजयी ठरलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह बक्षीस देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Ram Mandir is the work of building a Rashtra Mandir