त्यात विविध शाळांमध्ये कोरोनासदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. बं. मुलाचे व मुलीचे हायस्कूल, राष्ट्रीय कन्याशाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, सी. आर. कळंत्री प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय वाडे येथे गरजू विद्यार्थांना मास्क, सॅनिटाझर व पंपचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शाळा ज्यावेळी पूर्णपणे सुरळीत चालू होण्यास सुरुवात होईल, त्यावेळी या सर्व शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण करून देण्यात येतील, अशी ग्वाही रामचंद्र जाधव यांच्याकडून देण्यात आली. तसेच निर्जंतुकीकरण मोहिमेचा शुभारंभ कळंत्री विद्यालय येथे करण्यात आला.
तसेच विद्यार्थी व लहान बालक हा केंद्रबिंदू मानून मागील सहा वर्षांच्या कालावधीत विविध बाल आरोग्य संबंधीचे शिबिर घेऊन खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थी यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कायम प्रयत्न केले जात आहेत. मागील काळात आतापर्यंत हजारो बालकाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राजेश्वरीच्या स्मृतीना उजाळा देत खऱ्या अर्थाने तिला आदरांजली असल्याने सांगत भविष्यात नुकताच आरोग्याविषयी व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असे रामचंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात संगितले. शिबिर व विविध उपक्रम डॉ. सुनील राजपूत, डॉ. संदीप देशमुख यांच्या संकल्पेने व मार्गदर्शनाने राबविण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संजय वाघ, मुख्याध्यापिका इंगळे, मुख्याध्यापक के. एन. तडवी, मुख्याध्यापिका डॉ. साधना निकम, मुख्याध्यापक दायमा, मुख्याध्यापक एन. एस. बोरसे, विकास जाधव, प्रकाश मोरे, अशोक त्रिभुवन, प्रवीण जाधव, गणेश त्रिभुवन, कुणाल जाधव, आकाश सोनवणे, विशाल जाधव, अमित सोनवणे, यशराज जाधव आदी उपस्थित होते.