राजस्थानी समाजबांधवांचा
श्रावण मास सुरु
भुसावळ: गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा पर्यंत राजस्थानी समाज बांधवांचा श्रावणमास सुरू झालेला आहे. या दिवसांमध्ये शिवमंदिरात अभिषेक ,पूजा अर्चा करण्यात येत आहे. गुरुदेव पंडित जे. आर. शर्मा व पंडित प्रशांत भोंडे हे मार्गदर्शन करतात. सध्या सुरू असलेले कोरोनाचे महासंकट लवकरात लवकर जावे व सर्व नागरिकांना सुख, संपत्ती व चांगले आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. यावेळी प्रवीण अग्रवाल, गोकुळ अग्रवाल, जे. बी. कोटेचा, श्याम संभरिया, सुनील अग्रवाल, प्रमोद राठी , दीपचंद अगिवाल, विनोद शर्मा, विजय काबरा, प्रशांत वैष्णव, सोमनाथ चौरसिया, राजू गुरव आदी समाज बांधव सहकार्य करतात अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा यांनी दिली.