खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 20:00 IST2018-08-17T19:54:24+5:302018-08-17T20:00:27+5:30
खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.

खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा
सचिन देव
जळगाव : आषाढी एकादशीनंतर तब्बल २० दिवसांनी खान्देशात वरुणराजाचे आगमन झाले. खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या वाºयांचा प्रवाह उत्तरेकडे सरकल्याने उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ या भागात दमदार पाऊस सुरु होता. खान्देशात कुठेही १४ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. दोन दिवसांपासून पावसाचे दमदार आगमन झाले. आठवडाभर दररोजच पावसाच्या सरी बरसणार आहेत.
मान्सून वाºयांचे महाराष्ट्रात सर्वत्र आगमन झाले. खान्देशात २३ आॅगस्टपर्यंत पावसासाठी अनुकूल असे वातावरण आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम राहणार असून, दररोज मध्यम तर कुठे हलक्या सरी बरसणार आहेत. समुद्र सपाटीवर मान्सूनच्या वाºयांचा वेग वाढला तर, दमदार पाऊसदेखील होण्याची शक्यता आहे. दमदार खान्देशात कुठेही वादळी वाºयाची शक्यता नसून, मंद गतीने वारे वाहणार आहेत.
गेल्या आठवड्यात खान्देशात कुठेही पावसाचे वातावरण नव्हते. या आठवड्यात मात्र २३ आॅगस्टपर्यंत दररोज मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचे वातावरण आहे.
- के.एस.होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई.