शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:25 IST

निम्म्याहून अधिक तडाखा चोपडा तालुक्यात

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३० हजार २६०.९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक १६ हजार १९.७० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या वादळाने हिरावला आहे.मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे सर्व ३३ टक्केच्यावर नुकसान आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. यात सर्वाधिक सात हजार १०० हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार ७७७ हेक्टरवरील गव्हाला तर पाच हजार ८७० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसानमंगळवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. यामध्ये तालुक्यातील ९२ गावांमधील २०६९१ शेतकºयांच्या ३८३२ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले असून ३७८७ हेक्टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे २०८८ हेक्टरवरील केळी, २०७६ हेक्टरवरील हरभरा, १६७२ हेक्टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे.जळगाव तालुक्यातील ३३ गावांमध्ये ३४५२ शेतकºयांचे ७८२६ हेक्टरवर तर अमळनेर तालुक्यातील ४४ गावांमध्ये ४६१३ शेतकºयांचे ३५८९.९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव