Railway ticket inspector seat can not be denied ... | आता रेल्वे तिकीट निरीक्षक सीट नाकारू शकत नाहीत...
आता रेल्वे तिकीट निरीक्षक सीट नाकारू शकत नाहीत...

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांसाठी सोयी-सुविधा संकेत स्थळावर रिक्त बर्थची मिळेल माहिती

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता प्रवासी आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) संकेतस्थळावर आरक्षण चार्ट आॅनलाइन पाहू शकतात. तुम्हाला कळेल की प्रवासीगाडीमध्ये किती जागा शिल्लक आहे हे तुम्हाला आधीच कळू शकते. तुम्ही आरसीटीसीच्या वेबसाइटवर कुठल्याही गाडीचा रिझर्व्हेशन चार्ट पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला रेल्वे तिकीट निरीक्षकांकडे जाऊन विनंती करायची गरज नाही.
रिझर्व्हेशन चार्ट तपासू शकता
आरक्षण चार्ट तयार झाला की रेल्वे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तो अपलोड होतो. गाडी सुटण्याच्या ४ तास आधी साइटवर तो चार्ट दिसू शकतो. दुसरा चार्ट गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी दिसू शकतो. दुसऱ्या चार्टमध्ये पहिल्या चार्टमधील रिकाम्या सीट्सची माहिती मिळते.
अशी चेक करा सीट
रिझर्व्हेशन चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या साइटवर जावं लागेल. या वेबसाइटवर बूक विंडोच्या खाली पीएनआर स्टेट्सच्या शेजारी व्हेकन्सीचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा, मग नवा विंडो येईल.
यात तुम्हाला प्रवासाबद्दल माहिती मिळेल. यात तुम्हाला गाडीचे नाव, नंबर, प्रवासाची तारीख आणि बोर्डिंग स्टेशनची माहिती असते. मग तुम्हाला गेट ट्रेन चार्टवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यावर समोर एक विंडो उघडेल. या विंडोत सीटची श्रेणी होईल. म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग, थर्ड एसी, सेकंड एसी. तुम्हाला ज्या क्लासमध्ये प्रवास करायचाय त्यावर क्लिक करावं लागेल. कुठल्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशनपर्यंत बर्थ मोकळा आहे हे समोर येईल. कुठल्या कोचमध्ये कुठला बर्थ रिकामा आहे, हेही कळेल.
विंडोच्या खाली शेड्युल येईल. त्यावर क्लिक करा. ट्रेनचे पूर्ण श्येड्यूल समोर येईल. ट्रेन उशिरा आहे का हेही कळेल. हेही कळेल की कुठल्या स्टेशनवर सीट रिकामी मिळेल.
हे करा- चार्टमध्ये रिकामी सीट पाहून ती देण्यासाठी तुम्ही तिकीट निरीक्षकाला (टीटीआय) ला सांगू शकता. नवा चार्ट मोबाइलवरही पाहू शकता. तो डेस्कटॉपवरही दिसेल. सीट पाहण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉगइन करावे लागणार नाही. कुणीही हा चार्ट पाहू शकतो. माहिती यामुळे आता प्रवासादरम्यान वेटिंग तिकीट असताना चार्टवरचे अपडेट माहिती आपल्याला या वेबसाईटद्वारे मिळत राहील.


Web Title: Railway ticket inspector seat can not be denied ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.