रावेर तालुक्यातील अहिरवाडीला चाकूचा धाक दाखवून सव्वा दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:04 IST2018-09-11T13:03:30+5:302018-09-11T13:04:31+5:30

सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पोळ्याचा करीदिन जागवला

Raids of Ahirwadi in Raver taluka by stabbing a knife and stolen for two lakh rupees | रावेर तालुक्यातील अहिरवाडीला चाकूचा धाक दाखवून सव्वा दोन लाखांची चोरी

रावेर तालुक्यातील अहिरवाडीला चाकूचा धाक दाखवून सव्वा दोन लाखांची चोरी

ठळक मुद्देपोलिसात गुन्हा दाखल श्वानपथक पाचारण

रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील अहिरवाडी येथील रवींद्र चौधरी यांच्या घरात रात्री दरवाजा तोडून आत प्रवेश करीत तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी धारदार चाकूचा व कोयत्याचा धाक दाखवून तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने व ८० हजार रूपये रोख असा सव्वा दोन लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला. अहिरवाडी येथील बाहेरपुऱ्यात ही घटना घडली. रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अहिरवाडी गावातील बाहेरपुरा भागातील रहिवासी रवींद्र चौधरी यांच्या घरात सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास पंचवीशातील तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी दरवाजा ढकलून आत प्रवेश करत त्यांचे हातातील धारदार चाकू व घोड्याच्या नालीच्या आकाराचे कोयत्याचा धाक दाखवून वच्छलाबाई रवींद्र चौधरी, त्यांचे पती रवींद्र व दुसºया खोलीत झोपलेले सून व मुलगा यांचेकडून सोन्याचे राणीहार, टोंगल, बाळ्या, पदकाची सोन्याची पोत अंगठ्या असा आठ तोडे सोन्याची दागिने व ८० हजार रू रोकड घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली.
याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंवि कलम ४५८, ३९२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फैजपूर पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाकोडे यांनी भेट दिली. फिरते न्यायवैद्यक पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गांगुर्डे व श्वानपथकही पाचारण करण्यात आले.

Web Title: Raids of Ahirwadi in Raver taluka by stabbing a knife and stolen for two lakh rupees