चौपदरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या दगड व मुरुमाच्या खदानीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:31+5:302021-07-30T04:18:31+5:30
एरंडोल : ॲग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्यातर्फे एरंडोललगतच्या राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामासाठी लागणारा मुरूम ...

चौपदरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या दगड व मुरुमाच्या खदानीवर धाड
एरंडोल : ॲग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्यातर्फे एरंडोललगतच्या राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामासाठी लागणारा मुरूम व दगड एरंडोल उत्राण रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या मालकीच्या खदानीवरून नेला जातो. उपायुक्त कार्यालय नाशिकच्या पथकाने गुरुवारी दुपारी या खदानीवर धाड टाकली व तपासणी केली.
यावेळी प्रभारी तहसीलदार एस. पी. शिरसाठ यांना पाचारण करण्यात आले. यावेळी काही वाहने ओव्हर बर्डन आढळून आली. मुरूम व दगड भरलेल्या दोन वाहनांसह चार रिकामी वाहने जप्त करण्यात आली. ही वाहने एरंडोल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे. तसेच गौणखनिज वाहतुकीसंबधी आवश्यक असलेले परवाने व चलन तपासणीवेळी सादर करण्यात आले नाही. पथकातील चार अधिकारी व प्रभारी तहसीलदार एस. पी. शिरसाट यांनी कारवाई केली.
जप्त करण्यात आलेली वाहने पुढीलप्रमाणे मुरूम भरलेले ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ बीजी ६५६७, दगड भरलेला टाटा ट्रक एमएच १८ बीजी ११३०, रिकामी वाहने ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ सीवाय ५५३४,जेसीबी एमएच१९ बीजी ३६९१, टाटा ट्रक कमांक एमएच १९ सीवाय ५५७३, टाटा ट्रक क्रमांक एमएच १८ बीजी १२०५ दरम्यान अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे इंडिकेटर लागले आहे.
दि. ३० जुलैअखेर परवाने परमिट चलन वाहतूक पासेस संबंधित ठेकेदाराला तहसील कार्यालयात सादर करावी लागणार आहे अन्यथा दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.