जुगार अड्डयांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:06 IST2021-01-19T22:06:40+5:302021-01-19T22:06:40+5:30
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने मंगळवारी शहरातील तीन जुगार अड्डयांवर धाड टाकली. यात तीन जणांना अटक करण्यात आली ...

जुगार अड्डयांवर धाड
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने मंगळवारी शहरातील तीन जुगार अड्डयांवर धाड टाकली. यात तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने खंडेरावनगर, पिंप्राळ हुडको व आसोदा परिसरातील जुगार अड्डयावर धाड टाकली़ या ठिकाणाहून मयूर राजेंद्र शिंपी (२६, रा.खंडेरावनगर), वसिम खान पठाण (२६,रा.खॉजानगर, हुडको) व प्रवीण भिका कोळी (रा. कोळीवाडा, आसोदा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना लागलीच संबंधित पोलिसांच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़