भागवत कॉलनीतील मोठा मोबाईल टाॅवर त्वरित काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:27+5:302021-08-01T04:15:27+5:30
टॉवरच्या हाय पाॅवर रेडिएशनमुळे परिसरातील रहिवाशांना विविध आजार व त्रास जाणवत असून बऱ्याच नागरिकांना कॅन्सर, हाय बीपी, दम लागणे, ...

भागवत कॉलनीतील मोठा मोबाईल टाॅवर त्वरित काढा
टॉवरच्या हाय पाॅवर रेडिएशनमुळे परिसरातील रहिवाशांना विविध आजार व त्रास जाणवत असून बऱ्याच नागरिकांना कॅन्सर, हाय बीपी, दम लागणे, जीव घाबरणे, अपंगत्व आदी विविध प्रकारचे आजार जडत आहेत. परिसरातील रहिवाशांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे. तसेच हाय रेडिएशनमुळे कॉलनीत बऱ्याच रहिवाशांना अर्धांगवायू, कॅन्सर, रक्तदाबाने निधन झाले आहे. रोग जडण्याचे प्रमाण वाढत आहे. या मोबाइल टॉवरबाबत बऱ्याच वेळेस तोंडी तक्रारी दिल्या असून या आधी २० जून २०२० रोजी लेखी अर्जही दिला होता. मात्र भडगाव नगर परिषदेने कोणतीही कार्यवाही केली नाही. मोबाईल टॉवर येत्या पंधरा दिवसात काढला नाही, तर भागवत कॉलनीतील रहिवासी भडगाव नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर आर. डी. महाजन, श्यामकांत चव्हाण,
भगवान मिस्तरी, मंगला मिस्तरी, संगीता मिस्तरी, रिमा बडगुजर, पल्लवी अमृतकर, रूपाली अमृतकर, उषा शेलार, आदित्य पाटील, रावसाहेब महाजन, प्रवीण सुरवाडे, सतीश माळी, पंकज झवर, परेश झवर, श्रावण महाजन, रवींद्र शिरसाठ, विवेक शिरसाठ, मंगेश अमृतकर, दिनेश अमृतकर, डॉ. दिलीप पाटील, किशोर बडगुजर, सुकलाल दायमा, प्रकाश सुराणा, शुभम सुराणा, कविता माळी, किरण महाजन, सागर महाजन यांच्या सह्या आहेत.