वडली येथे लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST2021-09-11T04:17:53+5:302021-09-11T04:17:53+5:30
शिरसोली : येथून जवळच असलेल्या वडली येथील उपकेंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. येथील लस केंद्रावर नागरिकांनी लस ...

वडली येथे लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा
शिरसोली : येथून जवळच असलेल्या वडली येथील उपकेंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. येथील लस केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अठरा प्लस पहिला व दुसरा असे एकूण दोनशे पन्नास जणांनी लस घेतली.
लसीकरण घेणाऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये ह्याची खबरदारीही उपकेंद्रावर घेण्यात आली तसेच लसीकरण करते वेळी फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला. लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी शांततेत सर्वांनी लस घेतली. या वेळी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. उमर देशमुख, एम. पी. डब्लु. प्रशांत , ए. एन. एम. माधुरी कोचरे, सर्व आशा वर्कर आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.