भुसावळात गुणवंतांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:17 IST2018-09-05T00:16:04+5:302018-09-05T00:17:27+5:30

सन्मान : राजपूत समाजातर्फे झाले आयोजन

Quality honors in Bhusaval | भुसावळात गुणवंतांचा गौरव सोहळा

भुसावळात गुणवंतांचा गौरव सोहळा

भुसावळ, जि.जळगाव : राजपूत समाजातर्फे शहरातील कोळी समाज मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्टÑातून पहिले आलेले रोहितकुमार राजपूत यांच्यासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रा.सजनसिंग पवार अध्यक्षस्थानी होते.
राजपूत समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याची भावना पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी यावेळी बोलताना केले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतल्यास उच्च पदावर पोहचता येते, असे मनोगत रोहितकुमार राजपूत यांनी व्यक्त केले. याप्रसंगी योगेंद्रसिंग पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, चंद्रजितसिंग राजपूत, भुसावळचे गटविकास अधिकारी विलास भाटकर, एस.आर.पाटील, यावलचे पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी, नरवीरसिंग राऊळ, कुलदीप पाटील, रुपेशसिंग राजपूत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भगतसिंग पाटील यांनी प्रास्ताविक केले.
डी.एन.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रवीणसिंग पाटील यांच्यासह आयोजन समितीचे यशवंत चौधरी, अशोक पाटील, हर्षल पाटील, संदीप राणा, दिवाणसिंग राजपूत, पवन पाटील, समाधान पाटील, सुनील चौधरी, सोनी ठाकूर, डॉ.सुधीर पाटील, बंडू पाटील, एन.एल.पाटील, चंदू बोरसे, प्रदीपसिंग पाटील, यावल तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Quality honors in Bhusaval