बोर्डाच्या वाढीव गुणांमुळे पूर्वा पाटील एरंडोल तालुक्यात दहावीत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 22:41 IST2020-08-21T22:41:35+5:302020-08-21T22:41:42+5:30

रा.ति. काबरे विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी पूर्वा दीपक पाटील हिला एसएससी बोर्डाकडून १० गुण वाढले.

Purva Patil tops 10th in Erandol taluka due to increased marks of the board | बोर्डाच्या वाढीव गुणांमुळे पूर्वा पाटील एरंडोल तालुक्यात दहावीत अव्वल

बोर्डाच्या वाढीव गुणांमुळे पूर्वा पाटील एरंडोल तालुक्यात दहावीत अव्वल

एरंडोल : येथील रा.ति. काबरे विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी पूर्वा दीपक पाटील हिला एसएससी बोर्डाकडून गायन (शास्त्रीय संगीत) चे वाढीव गुण प्राप्त झाल्याने तिचे १० गुण वाढले. त्यामुळे तिची टक्केवारी ९४.४० झाली आहे. आता ती रा.ति काबरे विद्यालयातून व एरंडोल तालुक्यात अव्वल ठरली आहे.
पूर्वा पाटील या गुणवंत विद्यार्थिनीचा रा.ती काबरे विद्यालयातर्फे स्वातंत्र्यदिनी मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
पूर्वा ही कृषी पर्यवेक्षक दीपक हिंमतराव पाटील व व जि. प. शाळेतील प्राथमिक शिक्षिका स्वाती दीपक पाटील या दाम्पत्याची कन्या आहे.

Web Title: Purva Patil tops 10th in Erandol taluka due to increased marks of the board