शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुरुषोत्तम करंडकाचा मान यंदा औरंगाबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 1:32 PM

एकांकिका स्पर्धा : द्वितीय चोपडा तर मू. जे. महाविद्यालयाने पटकावला तिसरा क्रमांक

जळगाव : गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘मॅट्रिक’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक चोपडा येथील महात्मा गांधी मिशन संचलित कला वाणिज्य महाविद्यालयाच्या रंगबावरी या एकांकिकेला तर मू. जे. महाविद्यालयाच्या ‘इदी’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला.प्रथम विजेत्याला संघाला पुरुषोत्तम करंडक, ५ हजार रुपये तर द्वितीय संघाला ३ हजार रुपये व करंडक व व तृतीय क्रमाकांला २ हजार रुपये करंडक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत एकूण ८ महाविद्यालय सहभागी झाले होते. रविवारी सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. बक्षिस वितरणाला व्यासपीठावर केसीई सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. चारूदत्त गोखले, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मू. जे. चे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, महाराष्ट्रीय कलोपासक पुण्याचे राजेंद्र नागरे, परीक्षक म्हणून नाशिकचे प्राजक्त देशमुख, पुण्याचे प्रदीप वैद्य, नितीन धनधुके उपस्थित होते.बक्षिस वितरण कार्यक्रमात सिने अभिनेते संदीप मेहता यांची प्रा. प्रसाद देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी समाजात काय चालले आहे, समाजातील ज्वलंत प्रश्नांवर एकांकिका सादर करणे गरजेचे असल्याचे मत या मुलाखतीत मांडले. यावेळी त्यांनी आपला बालपणाचा प्रवास उलगडून जळगावातील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच यावेळी त्यांनी नाट्य क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरणही केले.स्पर्धेचा निकाल याप्रमाणेसर्वोत्कृष्ट अभिनय आणि प्रशस्तीपत्र -भूमिका - आबा -आकाश ताठे (एकांकिका- मॅट्रिक ), सर्वोत्कृष्ट लेखक आणि प्रशस्तीपत्र -लीना नारखेडे (एकांकिका ७२ चे गणित - नाहाटा महाविद्यालय भुसावळ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - फिरता करंडक आणि प्रशस्तीपत्र- भावना काळे आणि मुंजा माने (एकांकिका- मॅट्रिक)सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय- अवरोध -वेदांनी जोशी (एकांकिका ७२ चे गणित पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ) अभिनय स्त्री भूमिका चीमी -साक्षी वाणी (एकांकिका - रंगबावरी -) अभिनय पुरुष - भूमिका तात्या - श्रीकांत मंडलिक (एकांकिका -मॅट्रिक).मॅट्रिकसंकटावर मात करून मुलगी कशी शिकू शकते. अनेक घटकांना समोर ठेवून आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कुटुंबाची एका मुलीची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकांनी केला आहे. दिग्दर्शक -भावना काळे आणि मुंजा माने , शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादलेखक -प्रवीण पाटेकर,अभिनय : बाबा- आकाश काठे, आई- भावना काळे, चिमणी- श्रद्धा कांबळे, तात्या- श्रीकांत मंडलिक, मारुती -अजय हिवाळे, इसम - प्राक्तन पांडव, इसम २ - राहुल गुंजाळ, प्रकाशयोजना- शिव पमनानी, प्रकाश-धृव देशमुख, गायक -मुग्धा मोघे, बासरी- वेदांत कुलकर्णी, कीबोर्ड -ऋतुराज बाजी, संगीत -पल्लव वायकोस, नेपथ्य -प्रिया सुरवसे, वेशभूषा रंगभूषा -कोमल कोलानीरंगबावरीसोळाव्या वर्षी लग्न झालेल्या आणि त्यानंतर सहाच महिन्यात विधवा झालेल्या अल्पवयीन चिमीची ही गोष्ट दिग्दर्शक- वैष्णवी सोनार, कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय चोपडालेखक- संदीप दंडवते, अभिनय : चीमी -साक्षी वाणी, काकी -दीप्ती साळुंखे, अम्या -राहुल निकुंभ, बाळ्या -निखिल पाटील, सोनल- दिव्यांनी पठार ,लाल्या- निलेश माळी.प्रकाशयोजना- प्रमोद गुरव, संगीत योजना -प्रमोद पाटील, रंगभूषा आणि वेशभूषा- हितेश हडप, रंगमंच व्यवस्था -रोहित धनगर, रोहित पाटील, शीतल पाटील, वैष्णवी सोनार, नेपथ्य- दीपेश शुक्ल, संघप्रमुख डॉ. हरीश गंभीर चौधरी.असणं-नसणंमाणूस म्हणून जगण्याचा दृष्टीकोन कसा असावा हा विचार मांडण्याचा प्रयत्न सध्या एकांकिका व्यसन असणारे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक- दीपक बिरारी, प्रताप महाविद्यालय अमळनेर, मूळ लेखक राजन खान, नाट्यरूपांतर श्रेयश राजे,अभिनय: अनंता -दीपक बिरारी, आई -मोहिनी जोशी ,मंजिरी -निकिता दिसले, बाबा- निर्णय सोनार, भाऊ- रवींद्र मोरे, परेश पाटील, बाई एक- निकिता महाले, निकिता जैन, विशाखा शिंपी, मास्तर -रोहन शिंपी, वैभवी साक्षी विनय - करण सिंग परदेशी, शोभा -जागृती राठोड, पोस्टमन -राजेश पवार.संगीतकार -प्रितेश कुमार गजरे, प्रकाशयोजना -नाजिम पिंजारी.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव