हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी भावाने कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:09 IST2019-10-07T12:09:14+5:302019-10-07T12:09:51+5:30
ओल्या कापसाचे दिले जातेय कारण : कापूस खरेदी सुरु; सीसीआय केंद्राची प्रतीक्षा

हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी भावाने कापसाची खरेदी
जळगाव : जिल्ह्यात कापसाच्या नवीन हंगाम खरेदीला सुरुवात झाली असून, खासगी जिनींग मध्ये नवीन कापसाला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ते १२०० रुपये कमी दराने भाव मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिनींग मालकांकडून विक्रीसाठी येणारा कापूस ओला असल्याचे कारण देत कापसाला सध्या ३५०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव दिला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देत आहेत.
शासनाकडून यंदा कापसाला ५५५० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र, हा हमीभाव निश्चित केला असला तरी हमीभावा इतका देखील भाव नवीन कापसाला मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या मे महिन्यात लागवड झालेल्या मान्सूनपुर्व लागवडीचा कापूस विक्रीसाठी बाजारात पोहचत आहे. मात्र, हा कापूस घेताना शेतकऱ्यांवर अनेक अटी व शर्थी लावल्या जात आहेत.
ा आहे.
यंदा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
जोरदार पावसामुळे व जिल्ह्यात कापसाची लागवड देखील वाढली असल्याने कापसाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टरवर कापसाची लावगड होते मात्र, यंदा ५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली असल्याने २० लाख गाठींपर्यंत कापसाचे उत्पन्न होवू शकते.