खान्देशात २५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:34 IST2020-01-06T15:34:44+5:302020-01-06T15:34:58+5:30

अतिवृष्टीनंतरही कापसाचे विक्रमी उत्पादन ; विदेशातील निर्यात घटली ; ‘ट्रेड वॉर’ संपला तरच कापसाला ‘अच्छेदिन’

 Purchase of 5 lakh quintals of cotton in Khandesh | खान्देशात २५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी

खान्देशात २५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी

अजय पाटील।
जळगाव : यंदा झालेला अवकाळी व अतिवृष्टीमुळे कापसाला मोठा फटका बसला आहे. मात्र, एवढे नुकसान झाल्यावर देखील ४ जानेवारीपर्यंत खान्देशात खासगी व शासकीय खरेदी केंद्रावर २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली आहे. अतिवृष्टी होऊनही कापसाचे मोठे उत्पादन यंदा झाले आहे.
यावर्षी खरीप हंगामात संपूर्ण खान्देशात ८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित होती. मात्र, आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात घट होईल असे वाटत होते. दरम्यान, कापसाचे नुकसान झाले असले तरी उत्पादनात यंदा वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत २२ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी खान्देशात झाली होती. मात्र, यंदा ३ लाख क्ंिवटलने वाढ झाली आहे. यंदा १० ते १५ टक्के कापूस उत्पादन वाढल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे संचालक अनिल जैन यांनी दिली.
दरवर्षी खान्देशातून जानेवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुमारे ३ लाख क्ंिवटल कापसाची निर्यात होत असते. यंदा मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५० हजार क्विंटल कापसाची निर्यात झाल्याची माहिती अनिल जैन यांनी दिली. निर्यात कमी त्यातच जागतिक मंदीमुळे देशातील स्पिनींग उद्योगावर आलेल्या संकटामुळे यंदा कापसाची मागणी घटली आहे.

कापूस उत्पादकांवर ‘संक्रात’ कायम
जागतिक मंदीमुळे कापसाला यंदा फटका बसत आहे. त्यातच दुसरीकडे अमेरिका व चीनच्या ट्रेडवॉरमुळे देखील कापसाला चांगला भाव मिळू शकला नव्हता. आंतरराष्टÑीय बाजारात कापसाचे दर ठरविणाऱ्या न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने कापसाच्या दरात वाढ केल्याने चीनने देखील अमेरिकेकडून येणाºया कापसावर २५ टक्के टेरिफ (कर) लावल्याने न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने कापसाच्या दरात घट केली. जेणेकरून अमेरिकेच्या कॉटन निर्यातदारांना चीनने लावलेल्या करावर दिलासा मिळू शकेल. याचा परिणाम आंतरराष्टÑीय कापसाच्या भावावर होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे ट्रेडवॉर कायम आहे. चीनने भारताकडून येणाºया कापसाची आयात थांबविली आहे. दरम्यान, आतापर्यंत चीनने अमेरिकेच्या कापसावर लावलेला कर कमी किंवा रद्द केलेला नाही. जो पर्यंत जीन टेरीफ कमी करणार नाही. तो पर्यंत न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजकडून भावात वाढ केली जाण्याची शक्यता कमीच आहे. दरवर्षी मकर संक्रातीनंतर निर्यातदारांचे सौदे सुुरु होतात. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ होत असते. मात्र, यंदा तशी परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे संक्रातीनंतरही भाव वाढण्याची शक्यता कमी असल्याची माहिती हर्षल नारखेडे यांनी दिली.

Web Title:  Purchase of 5 lakh quintals of cotton in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.