केळीवरील ‘कुकुंबर मोझाईक’चे पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:14 IST2020-08-27T22:14:06+5:302020-08-27T22:14:29+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून केळी पिकावर कुकुंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) आढळून येत असल्याने या व्हायरसग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे ...

केळीवरील ‘कुकुंबर मोझाईक’चे पंचनामे करण्याचे आदेश
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून केळी पिकावर कुकुंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) आढळून येत असल्याने या व्हायरसग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्ह्यात केळी पिकावर कुकुंबर मोझाईक व्हायरस (सीएमव्ही) आढळून येत असून यामुळे केळी पिकाचे संपूर्ण उत्पन्न वाया जाणार आहे. यामुळे केळी पिक पूर्ण हातातून जाण्याची नामुष्की ओढावली आहे. या संदर्भात गुरुवार, २७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी राऊत यांच्या दालनात अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यात जिल्हाधिकाºयांनी या व्हायरसग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
या व्हायरसमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून या विषयी शासनाकडूनही विचारणा होत आहे. याचा अहवाल ३ सप्टेंबरपर्यंत शासनास सादर करायचा आहे. त्यामुळे शेतकºयांना सदर आपत्तीचा लाभ मिळण्यासाठी या संदर्भातील पंचनामे करावे व अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.