नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:30+5:302021-09-12T04:20:30+5:30
अमळनेर येथील मराठी साहित्य परिषद ,साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि मराठी वाङ्मय मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या ...

नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचे प्रकाशन
अमळनेर येथील मराठी साहित्य परिषद ,साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि मराठी वाङ्मय मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांनी कथासंग्रहातील विविध कथांचा आढावा घेतला.
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन यांचा सत्कार गौरवचिन्ह देऊन करण्यात आला. ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील व अहिराणी साहित्यिक तहसीलदार सुदाम महाजन यांनी नाते रुजविणे आणि टिकविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत आपल्या खुमासदार शैलीने रसिकांची मने जिंकून घेतली. डॉ. मिलिंद बागूल व आकाशवाणी केंद्र संचालक अनिरुद्ध कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक लेखक वेदांशू पाटील यांनी केले. संदीप घोरपडे व प्रा. लीलाधर पाटील यांनी परिचय करून दिला. व्यासपीठावर म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार, साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, आदी उपस्थित होते. आभार रणजित शिंदे यांनी मानले. वसुंधरा लांडगे यांनी प्रार्थना व पसायदान म्हटले. अतुल खैरनार, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, पत्रकार जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, कैलास पाटिल, नीलेश वाघ, हितेश बडगुजर, राहुल पाटील, चिन्मय पाटील, अमळनेर महिला मंच, प्रतीक जैन रोटरी क्लब, ठाकूर समाज मंडळ यांनी
परिश्रम घेतले.
फोटो ओळी : नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचे प्रकाशन करताना प्राचार्य तानसेन जगताप. सोबत डॉ. मिलिंद बागुल, कृष्णा पाटील, तहसीलदार सुदाम महाजन, आबा महाजन, आदी (छाया : अंबिका फोटो)