जळगावात भाजपाच्या जाहिरनाम्याचे सर्वसामान्यांच्या हस्ते प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:55 IST2018-07-27T18:51:36+5:302018-07-27T18:55:26+5:30
भाजपाच्या मनपा निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन सर्वसामान्यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी करण्यात आले.

जळगावात भाजपाच्या जाहिरनाम्याचे सर्वसामान्यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव- भाजपाच्या मनपा निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन सर्वसामान्यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी करण्यात आले. यावेळी शहराचा विकास हाच ध्यास असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
तुकारामवाडी भागात जाहिरनाम्याचे प्रकाशन त्या भागातील सर्वसामान्यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल व उन्मेष पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार उपस्थित होते.
जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘विसंबून कुणावरही नसलेला, सक्षम, दमदार व खाऱ्या वचनाचा जाहीरनामा’ असा उल्लेख केला आहे. आतील पानात सुरुवातीलचा शहरातील दुर्दशेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच ‘तेहतीस वर्ष एक हाती सत्ता असूनही जळगाव मागे का? असा सवाल करीत भ्रमनिरास झाल्याची टिका केली आहे. याव्यतिरिक्त आता परिवर्तन होणार.. बदल घडणार, भाजपाच घडविणार असा विश्वास व्यक्त करीत भाजपास मत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.