शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

जळगावात महारॅलीद्वारे अवयवदानाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:26 PM

पथनाट्याने वेधले लक्ष

ठळक मुद्दे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अयोजनजनजागृतीपर उपक्रम

जळगाव : अवयवदानामुळे इतर गरजूंना त्याचा उपयोग होऊन अनेकांना जीवदान मिळण्यास मदत होते, हा संदेश पोहचविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या महारॅलीद्वारे अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या सोबतच सादर करण्यात आलेल्या पथनाट्याने लक्ष वेधून घेतले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अवयवदानाचे महत्त्व कळावे यासाठी गेल्या आठवड्यापासून जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये रांगोळी, निबंध, पोस्टर स्पर्धा, विविध चर्चासत्र असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून १८ सप्टेंबर रोजी अवयवदानाची जनजागृती व्हावी यासाठी रॅली, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.पथनाट्यातून जनजागृतीजिल्हा रुग्णालय परिसरात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, नगरसेवक अमित काळे, अरविंद देशमुख उपस्थित होते. आमदार भोळे यांनी आपल्या मनोगतातून अवयवदानाविषयी माहिती दिली. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी अवयवदान अभियान अंतर्गत महाविद्यालयाकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.या वेळी काढण्यात आलेल्या महारॅलीला आमदार सुरेश भोळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. जिल्हा रुग्णालयापासून रॅलीला सुरुवात झाली व ही रॅली स्वातंत्र्य चौक, बस स्थानक, स्टेट बँक चौकमार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. या रॅलीमध्ये अवयवदानाविषयी संदेश देणारे विविध फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. त्यातून विविध संदेश देण्यात आले. या सोबत विद्यार्थ्यांनी अवयवदानाविषयी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. वैद्यकीय अभ्यासक्रम तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेत अवयवदानाची ही चळवळ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले.केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे डॉक्टर्स आणि कर्मचारीदेखील सहभागी होते. अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बिना कुरील व डॉ योगिता बावस्कर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी डॉ.मारोती पोटे, डॉ.अरुण कासोटे, डॉ. सईदा अफरोज, डॉ. संजय गायकवाड, डॉ.चंद्र शेखर डांगे, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.शुभांगी डांगे, डॉ.सौरभ कुलकर्णी, डॉ.वैभव सोनार, डॉ.लोखंडे आदी उपस्थित होते. डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, बागुल यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

टॅग्स :Organ donationअवयव दानJalgaonजळगाव