रुग्णवाहिका चालक व सफाई कर्मचाऱ्यांना विमा प्रमाणपत्र प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST2021-08-01T04:17:02+5:302021-08-01T04:17:02+5:30

शिवसेना महानगर उपप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिकेचे चालक व त्यांचे सहकारी तसेच सफाई कामगारांचा एक वर्षाचा ...

Provide insurance certificates to ambulance drivers and cleaners | रुग्णवाहिका चालक व सफाई कर्मचाऱ्यांना विमा प्रमाणपत्र प्रदान

रुग्णवाहिका चालक व सफाई कर्मचाऱ्यांना विमा प्रमाणपत्र प्रदान

शिवसेना महानगर उपप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिकेचे चालक व त्यांचे सहकारी तसेच सफाई कामगारांचा एक वर्षाचा आरोग्य विमा काढण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विमा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे आदींची उपस्थिती होती.

शिवसेनेचे सर्वाधिक काम

कोरोनाच्या लाटेचा प्रतिकार करताना सर्वसामान्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणात झटले, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. जिल्ह्यात सर्वाधिक १७ रुग्णवाहिका या शिवसेना पक्षाकडेच असल्याचे नमूद करत पालकमंत्री म्हणाले की, कार्यकर्त्यांनी नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून समाजसेवा करायला हवी, असे आवाहन केले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, डॉ. हर्षल माने, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंबळे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, श्याम कोगटा, विस्तारक किशोर भोसले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी केले. सूत्रसंचालन शाखा प्रमुख जयवर्धने यांनी केले तर युवराज विभागप्रमुख गालफडे यांनी आभार मानले.

Web Title: Provide insurance certificates to ambulance drivers and cleaners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.