अर्थसंकल्पाचा निषेध करत जळगावमध्ये काँग्रेसने नागरिकांना गाजर वाटून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2023 17:36 IST2023-03-10T17:36:34+5:302023-03-10T17:36:44+5:30
यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्थसंकल्पाचा निषेध करत जळगावमध्ये काँग्रेसने नागरिकांना गाजर वाटून केले आंदोलन
जळगाव- अर्थसंकल्पातून राज्य सरकारने जनतेला गाजर दाखवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने आज पाचोरा येथे गाजर वाटून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवले असून या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ पाचोरा येथे काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गाजर वाटून आंदोलन करत अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला.
शेतकरी महिला लघुउद्योग यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारने केली नसून अर्थसंकल्पातून जनतेला केवळ गाजर दाखवले आहे. त्यामुळे जनतेला गाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध करत काँग्रेसने राज्य सरकाचे लक्ष वेधले आहे. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.