जळगावात बिधूडींच्या वक्तव्याविरोधात धरणे आंदोलन!फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी

By विलास बारी | Updated: September 29, 2023 19:41 IST2023-09-29T19:41:36+5:302023-09-29T19:41:52+5:30

समाजवादी पार्टीकडून खासदाराचा निषेध :

Protest against Bidhudi's statement in Jalgaon! | जळगावात बिधूडींच्या वक्तव्याविरोधात धरणे आंदोलन!फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी

जळगावात बिधूडींच्या वक्तव्याविरोधात धरणे आंदोलन!फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी

जळगाव: बसपाचे खासदार कुंवर दानीश अली यांच्याविरुद्ध गलिच्छ शब्दात वक्तव्य करीत भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी मुस्लीमबांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत समाजवादी पार्टीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

भाजप खासदार रमेश बिधुडी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रईस बागवान, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हाजी आसीफ पटेल, महानगराध्यक्ष रिजवान जहांगीरदार, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, भरत कर्डिले, बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्र अहिरे, छावाचे प्रमोद कोल्हे, इमदाद फाऊंडेशनचे मतीन पटेल, अल्फेज फाऊंडेशनचे अजिज सालार आदींनी भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला आणि समाजवादी पार्टीच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

 

Web Title: Protest against Bidhudi's statement in Jalgaon!

टॅग्स :Jalgaonजळगाव