पाटणादेवी येथील मंदिरासाठी ट्रस्ट स्थापण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:45 IST2019-11-05T11:45:04+5:302019-11-05T11:45:36+5:30
जळगाव : पाटणादेवी मंदिर हे वनविभागाच्या जागेत असून ते पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. मात्र या मंदिरात स्थानिक पुजारी गेल्या ...

पाटणादेवी येथील मंदिरासाठी ट्रस्ट स्थापण्याचा प्रस्ताव
जळगाव : पाटणादेवी मंदिर हे वनविभागाच्या जागेत असून ते पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. मात्र या मंदिरात स्थानिक पुजारी गेल्या १०० वर्षांपासून पूजा करीत असल्याने ग्रामस्थ, पुरातत्व विभाग व वनविभाग असा वाद निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पाटणादेवी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
शासनाने हा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविला आहे. तसेच या मंदिराकडे जाणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या पाटणादेवी मंदिरात पूजा करण्यावरून सध्या वाद उद्भवला आहे. हे मंदिर वनविभागाच्या जागेत आहे. तर सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. मात्र या ठिकाणी स्थानिक पुजारी हे गेल्या त्यांच्या काही पिढ्यांपासून पूजा करीत आले आहेत. किमान १०० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. हा वाद जिल्हाधिकाºयांकडे पोहोचला आहे. त्यात सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे बैठकही झाली. त्यामुळे ट्रस्ट स्थापण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने धर्मादाय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांनी त्यावर वनविभाग व पुरातत्व विभागाची ना-हरकत मागविली आहे. त्यावर निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी करून या वादावर तोडगा काढला जाईल.