गाव स्वच्छतेसाठी प्राध्यापिकेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:20 IST2020-04-18T15:17:56+5:302020-04-18T15:20:00+5:30
बांबरूड येथे गावातील युवक तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मूळ बाबरूडच्या रहिवासी असलेल्या करुणा परदेशी यांनी एकत्र येत संपूर्ण गावाची सफाई मोहीम हाती घेतली.

गाव स्वच्छतेसाठी प्राध्यापिकेचा पुढाकार
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या बांबरूड, ता.भडगाव येथे गावातील युवक तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मूळ बाबरूडच्या रहिवासी असलेल्या करुणा परदेशी यांनी एकत्र येत संपूर्ण गावाची सफाई मोहीम हाती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या या मोहिमेची गावकऱ्यांनीही मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
संपूर्ण गाव स्वच्छ सुंदर बनवत या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी एक मॉडेल बनवून ते गावाच्या मुख्य ठिकाणी बसवले. तेथून येणाºया-जाणाºया प्रत्येक व्यक्तीवर या मॉडेलद्वारे सॅनिटाईज होते. एक चांगले काम येथील युवकांनी व प्रा.परदेशी यांनी हाती घेतल्याने या कामाचे गावकऱ्यांनी तसेच परिसरातील खेड्यांवरील नागरिकांकडून कौतुक होत आहे
स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण गाव स्वच्छ, सुंदर केले आहे. गावाची साफसफाई झाल्याने गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. गाव चकाचक झाले आहे. याबरोबरच गावात मुख्य ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी बनविलेले मॉडेलही लक्ष वेधून घेत आहे.