शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आजारपणाला कंटाळून जळगावात प्राध्यापकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:04 PM

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह प्राध्यापकांची गर्दी

जळगाव : परदेशात वास्तव्यास असलेली मुलगी व मुंबई येथे शिकत असलेला भावी संशोधक मुलगा या दोघांना घरी बोलावून घेतले, त्यानंतर त्याची शेवटची भेट घेवून नूतन मराठा विद्यालयाचे प्रा. किशोर यादवराव देशमुख ( ५८, रा. शिवकॉलनी) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. प्रा. देशमुख यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत शारिरीक व्याधींना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे़शिवकॉलनी येथे गट नं. ५५ , प्लॉट नं़ ४० याठिकाणी प्रा. किशोर देशमुख हे पत्नी कुमूदिनी यांच्यासह वास्तव्यास होते. देशमुख यांना मुलगा व मुलगी आहे. मुलगा कुणाल हा मुंबई येथे इंडियन क्लिनीकल रिसर्च येथे शिक्षण घेत आहे. तर मुलगी केतकी हिचा विवाह झाला असून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी प्रा.देशमुख यांनी मुलगा कुणाल व मुलगी केतकी हिला जळगावात घरी बोलावून घेतले. त्यामुळे एक ते दोन दिवसांपासून मुलगा व मुलगी घरी आले होते़प्रा. देशमुख यांच्या पार्थिवावर नायगाव ता. यावल येथे शुक्रवार ६ रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.गुरूवारी सकाळी पत्नी वरच्या घरात पती प्रा.देशमुख यांना उठविण्यास गेली असता, त्यांनी साडीने गळफास घेतल्याचे ते आढळून आले. आरडाओरड केल्यानंतर मुलगा, मुलगी तसेच शेजारचे नागरिक धावून आले. व त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.प्रा. देशमुख हे नायगाव (ता. यावल) येथील मूळ रहिवासी आहेत. भाऊ मनोज व आई हे गावाकडे राहतात. देशमुख हे सन १९८७ पासून नूतन मराठा विद्यालयात प्राध्यापक म्हणून इलेक्ट्रॉनिक विभागात कार्यरत होते. जुलै २०२० मध्ये सेवानिवृत्त होणार होते, अशी माहिती प्राध्यापक सहकाऱ्यांनी दिली. अत्यंत शांत स्वभावाचे तसेच कमी बोलणारे प्राध्यापक म्हणून देशमुख महाविद्यालयात परिचित होते. बुधवारी त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकांसमवेत जेवणही केले. किमान कौशल्य समिती तपासणीसाठी येणार असल्याचे त्यासाठी तयारी सुरु होती, या तयारीत प्रा.देशमुखही सहभागी होते. मात्र सकाळी अचानक आत्महत्येच्या घटनेने प्राध्यापकांनी सुन्न झाले होते. सर्व सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले होते.प्रामाणिक आणि हाडाचा शिक्षकाचे अचानक जाण्याने आम्हाला सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी कधीच कुणाबद्दल तक्रार केली नाही आणि त्यांच्याबद्दलही कुणाचीही तक्रार नव्हती. अशी माणसं फार कमी असतात. -प्राचार्य एल.पी.देशमुख, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव