शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

प्रा.वा.ना. आंधळे यांच्या कवितेचा वेध : ‘फर्मान आणि इतर कविता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 4:22 PM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात ज्येष्ठ कवी, गझलकार प्रा.वा.ना. आंधळे यांच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर आधारित समीक्षात्मक ग्रंथाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय.

जगाच्या नकाशावर समाजहिताचा अजेंडा नेणारी ‘आई’! मला जन्म घेऊ दे ! ही अभियान कविता ज्यांनी लिहिली त्या सुप्रसिद्ध गझलकार प्रा.वा.ना. आंधळे यांंच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर आधारित नुकताच समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालाय.अथर्व पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ‘फर्मान आणि इतर कविता आशय आणि आस्वाद’ या समीक्षा ग्रंथाचे संपादन डॉ.तुषार चांदवडकर यांनी केले आहे.या ग्रंथात महाराष्टÑातील व महाराष्टÑाबाहेरील ४० नामवंत समीक्षक अभ्यासकांनी प्रा.आंधळे यांच्या कवितेचा वेध घेत लेखन केले आहे.सर्व मान्यवर समीक्षाकांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी, डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ.अश्विनी धोंगडे, डॉ.सतीश बडवे, डॉ. मनोहर जाधव, डॉ.केशव मेश्राम, डॉ.एकनाथ पगार, डॉ.मृणालिनी कामत, डॉ.श.रा.राणे, डॉ.फुला बागुल, वि.दा.पिंगळे, प्रा.डॉ.सुरेश भिलकोटकर या लेखकांच्या नामोल्लेखावरून ग्रंथाचे सौंदर्य वाचकांच्या अंतरी निश्चितच जाईल.प्रा. आंधळे यांची गझल ही आत्मसंवादी व लोकसंवादी कशी आहे, याचे मर्म उलगडत या गझलेने सामाजिक विषमतेचा निषेध कसा नोंदवलाय याचा सुंदर वेध या ग्रंथातून समीक्षकांनी घेतलेला दिसून येईल.काव्यनिष्ठा आणि प्रबोधनात्मक जाणिवा याची सुंदर वीण देणाऱ्या या गझलकाराला खान्देशातील संपन्न कवी परंपरा असलेल्या कवीकुळातील श्रेष्ठ कवी संबोधून फर्मानरूपी असलेलं हे काव्य गोंदण खान्देशी काव्याचे सौभाग्य लेणं आहे, या शब्दात समीक्षा लेखकांनी प्रा. आंधळे यांच्या काव्यलेखनाचे मनस्वी कौतुक केलेय.एखाद्या काव्यसंग्रहाची एकंदर समीक्षा काव्य जाणीव कशी समृद्ध करते याचा वस्तुपाठ म्हणजे ‘आशय आणि आस्वाद’ हा समीक्षा ग्रंथ होय, असे अभ्यासपूर्ण भाष्य मराठीचे अभ्यासक प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे ग्रंथाच्या मलपृष्ठावर करतात.संपादक डॉ. तुषार चांदवडकर, प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स, पृष्ठे : २७८, मूल्य ३५० रुपये.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव