रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 10:23 PM2021-05-22T22:23:42+5:302021-05-22T22:24:28+5:30

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून सुरू झाली आहे.

The process of depositing Rs. 1,500 in the autorickshaw driver's account has started | रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Next
ठळक मुद्देऐन लाॅकडाऊनमध्ये रिक्षाचालकांना मिळाला दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून सुरू झाली आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड हजारांची मदत तत्काळ जमा केली जाईल. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होत आहे.

कोरोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘आयसीआयसीआय’बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षा चालकांच्या खात्यात तत्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांना या मदतीमुळे हातभार लागणार असल्याचं माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील रिक्षाधारकांनी या निर्णयाचे स्वागत करून शासनाचे आभार मानले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title: The process of depositing Rs. 1,500 in the autorickshaw driver's account has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.