महिला क्रीडा मंडळातर्फे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:41+5:302021-08-01T04:15:41+5:30

भुसावळ : येथे गेल्या ५५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला क्रीडा मंडळातर्फे लॉकडाऊनमध्ये विविध प्रकारच्या ऑनलाइन स्पर्धा ...

Prize distribution by Women's Sports Board | महिला क्रीडा मंडळातर्फे बक्षीस वितरण

महिला क्रीडा मंडळातर्फे बक्षीस वितरण

भुसावळ : येथे गेल्या ५५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला क्रीडा मंडळातर्फे लॉकडाऊनमध्ये विविध प्रकारच्या ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात संगीत खुर्चीसह इतर स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण डॉ. नीलिमा नेहेते यांच्या हस्ते करण्यात आले.

मंडळाच्या अध्यक्ष आरती चौधरी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष लता होसकोटे, कोषाध्यक्षा जयश्री ओक, स्वाती नाईक, सुनीता पाचपांडे, प्रभा पाटील, प्राची राणे, अनिता कवडीवाले, डॉ. संज्योत पाटील, वीणा ठाकूर, वैशाली भगत, दीपा सोनार, वैशाली बऱ्हाटे, माधुरी गव्हाळे, लता ढाके हजर होत्या. राजश्री कात्यायनी यांनी स्वरचित स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन संजीवनी पिंगळे यांनी, तर आभार प्रगती ओक यांनी मानले.

भारती चौहान, नेहा नाईक, धनश्री भिरुड, डॉ. उर्मी ठक्कर या मंडळाबाहेरच्या महिलांना बक्षिसे मिळाली. जयश्री दवे, स्वाती नाईक, पिंगळे, लता होसकोटे, जयश्री ओक यांना बक्षिसे देण्यात आली. मंडळाच्या प्रभा पाटील यांनी लिहिलेले भजनाचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Prize distribution by Women's Sports Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.