शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:18 IST

प्रशांत भदाणे, जळगाव - "मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे ...

प्रशांत भदाणे,जळगाव"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले गेले, त्याचे परिणामही मला भोगावे लागले. पण श्वेतपत्रिका म्हणजे राज्याच्या जनतेशी साधलेला संवाद असतो. ती सरकारची कामाची एक दिशा, स्ट्रॅटेजी आणि ब्लू प्रिंट असते", असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी रविवारी दुपारी जळगावात केलं.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिरोदा येथे आयोजित माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात मुख्य सत्कारार्थी म्हणून भाषण करतांना ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारमध्ये श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याच विषयाला चव्हाणांनी आज पुन्हा हात घालत राष्ट्रवादीला डिवचल्याचं बोललं जातंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या काळात त्यांनी सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहारासंदर्भात, तसेच या क्षेत्रात काय भरीव कामगिरी करता येईल, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची आग्रही मागणी केली होती. त्याच मुद्द्यावरून त्याकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचा इतिहास आहे. याच विषयाला अनुसरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावात हे वक्तव्य केलं. माजीमंत्री स्व. मधुकरराव चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलं. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी काढलेली श्वेतपत्रिका राज्याला मार्गदर्शक ठरली. हाच दाखला देत त्यांनी श्वेतपत्रिकेच्या मुद्द्याला हात घातला.

तर आज पक्षही फुटले नसते...

आजच्या या पाच वर्षांच्या घडामोडींमध्ये जर बाळासाहेब चौधरींसारखा सभापती असता, तर हे राजकारण घडलंच नसतं. पक्षही फुटले नसते, राज्याला न्याय मिळाला असता. पण नाही मिळाला. हरकत नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने आम्हाला न्याय दिला. विधानसभेच्या निवडणुकीत पण जनता आम्हाला न्याय देईल, असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणJalgaonजळगाव