भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारात हातभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:34 IST2018-11-27T15:33:15+5:302018-11-27T15:34:00+5:30
भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख २७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व कच्चे रसायन नष्ट केले.

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारात हातभट्टीवर छापा
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कन्हाळा शिवारातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख २७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व कच्चे रसायन नष्ट केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यतील कन्हाळा शिवारात गावठी हातभट्टी सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे डीवायएसपी गजानन राठोड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पो.कॉ.अजय माळी, प्रवीण पाटील, डीवायएसपी यांच्या पथकाने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता आरोपी युनुस हसन गवळी (रा.कन्हाळा) हे करीत असलेल्या बटाईच्या शेताजवळील बंधाऱ्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला. घटनास्थळावरुन एक लाख २५ हजार रुपयांचे पाच हजार लीटर कच्चे रसायन, दोन हजार ५०० रुपयांचे २०० लीटरचा एक ड्रम उकळते रसायन असे एकूण एक लाख २७ हजार ५०० रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले.
याबाबत तालुका पोलिसात पो.कॉ.संकेत झांबरे यांच्या फिर्यादीवरुन युनुस हसन गवळी यांच्याविरुद्ध गुरनं. १७४/१८, मुंबई पोलीस कायदा कलम ६५ फ.ब.क. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला. तपास पीएसआय दिलीप पाटील करित आहे.