पहूर जवळ जुगारावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:02 IST2019-02-08T00:01:57+5:302019-02-08T00:02:14+5:30

नऊ जुगाऱ्यांना अटक

Print the gambler near the watch | पहूर जवळ जुगारावर छापा

पहूर जवळ जुगारावर छापा

पहूर, ता. जामनेर : पहूर जवळील हिवरखेडा रोडलगत सुरु असलेल्या जुगार अड्यावर पहूर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारून नऊ जुगाऱ्यांना अटक करीत पाच हजार पन्नास रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरखेडा रोडलगत शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, शशिकांत पाटील, अनिल देवरे, नवल हटकर, किरण शिंपी यांनी बुधवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकला आहे. यादरम्यान जुगार खेळताना केतन प्रकाश जाधव, सागर रामराव पाटील, देवेंद्र सुभाष भोई, ज्ञानेश्वर मोतीलाल चौधरी, विनोद अशोक चौधरी, अरीफ मुखतार तडवी, महेश बाळकृष्ण महालपूरे, अमोल अरूण पाटील, सतीश कडू पांढरे यांना ताब्यात घेतले. पो.कॉ. साहेबराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

Web Title: Print the gambler near the watch

टॅग्स :Jalgaonजळगाव