शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

जळगाव विमानतळावर पंतप्रधानांच्या आगमनाचे चोरून चित्रीकरण, सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 9:47 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी कडक सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले.

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी कडक सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले. तब्बल ३ मिनिटे ५७ सेकंदाचा हा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी व जळगाव पोलिसांची कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही साधारण २०० मीटर अंतरावरून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. यावरून सुरक्षा यंत्रणेचा गलथानपणा उघड झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह इतर मंत्री शनिवारी धुळे दौ-यावर होते. त्यासाठी विमानाने ते जळगावात दुपारी १.५० वाजता दाखल झाले. पंतप्रधानांना असलेली कडक सुरक्षा पाहता एक दिवस आधीच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने विमानतळाचा ताबा घेतला होता. त्याशिवाय हजारो पोलीस, कमांडो, अधिकारी तैनात करण्यात आले होते. असे असताना सुरक्षा यंत्रणेचे कसे धिंडवडे उडविले जातात, याचा व्हिडीओ वायरल झालेला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सुरक्षा यंत्रणेला मोठे आव्हान या व्हिडीओने निर्माण केलेले आहे.दोनशे मीटर अंतरावरून पाईपातून केले शूटिंगपंतप्रधानांचे विमान ज्या ठिकाणी उतरले, अगदी त्या ठिकाणापासून दोनशे मीटरच्या अंतरावरच पाईपांमधून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. बोली भाषेवरून शूटिंग करणारे स्थानिकच असून ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत की विमानतळावर कामाला असलेले लोक आहेत हे स्पष्ट झालेले नाही. किमान पाच ते सहा लोक या ठिकाणी आहेत. हा व्हिडीओ कोणी केलेला आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.मोदींचा टायगर म्हणून उल्लेखविमान पोहोचल्यानंतर प्रथम सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी विमानातून बाहेर येतात. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव आदी येतात. त्यानंतर एका मिनिटांनी पंतप्रधान मोदी येतात. शूटिंग करणा-यांच्या तोंडून सर्वच मंत्र्याचे नाव घेतले जाते. त्यानंतर मोदी जेव्हा विमानातून बाहेर येतात, तेव्हा त्यांचा टायगर म्हणून हे उल्लेख करतात. या सगळ्यांचे चोरून चित्रीकरण यात करण्यात आले आहे.काय आहे व्हिडीओतव्हिडीओ तयार करणाºयांमध्ये संवादही सुरु आहे. मोबाईल व्यवस्थित घ्या, वर घेऊ नका..स्वप्नील भाऊ कोणाला त्रास व्हायला नको..गडकरी साहेब आले..फडणवीस साहेब भी आहे रे भो...अरे मोदी साहेब येताहेत अजून...राज्यपाल साहेब येतात...मोदी साहेब नाहीत...दिसलं का रे पगारे भाऊ...अजून दिसलं नही तुले..काळ्या कपड्यावर दिसत नाही का तुले...बरं..बरं..एन्ट्री होतेय..राज्यपालांच्या बाजुला आमदार, एस.पी.साहेब...असे म्हणत असतानाच मोदी विमानातून बाहेर येतात...तेव्हा आला रे बाप...टायगर आला टायगर असे संवाद या व्हिडीओत आहेत.पोलीस अधीक्षकांकडून प्रतिसाद नाहीया प्रकाराबात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर दोनवेळी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी