नशिराबाद : स्वामिनारायण मंदिराचे बांधकाम लाल बंसीपाडपूर दगडांमध्ये होत आहे. या मंदिराच्या आवारात माघ शुक्ल नवमीच्या शुभदिनी मुहूर्तावर हनुमानाची भव्य दिव्य मूर्ती घडविण्याच्या व नक्षी कामाच्या कार्यास प्रारंभ करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव-भुसावळ दरम्यान दूरदर्शन केंद्राजवळ स्वामिनारायण मंदिराचे बांधकाम लाल बंसीपाडपूर दगडांमध्ये होत आहे. या मंदिराच्या आवारात ब्लॅक ग्रॅनाईटमध्ये देशातील सर्वप्रथम असणारी ५४ फूट उंचीची हनुमानाची मूर्ती साकारली जात आहे. त्यानिमित्त माघ शुक्ल नवमीच्या शुभमुहूर्तावर हनुमानाची भव्यदिव्य मूर्ती घडविण्याच्या व नक्षी कामाच्या कार्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पूज्य स्वामी गोविंदप्रसाददासजी, पूज्य शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी, पूज्य शास्त्री धर्मस्वरूपदासजी, पूज्य स्वामी धर्मनंदनदासजी, बन्सीभाई पटेल, भगवतीभाई पटेल, जगदीशभाई पटेल, कांतीभाई पटेल, राजूभाई रवाणी घनश्यामभाई मुखी इत्यादी हरिभक्त उपस्थित होते. अशा भव्यदिव्य मूर्तीचे निर्माण कार्य एक वर्षापर्यंत चालेल, असे पूज्य शास्त्री पुरुषोत्तमप्रकाशदासजी महाराज यांनी लोकमतला सांगितले.