जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील तरुणी अत्याचारातून गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 20:25 IST2018-10-14T20:22:55+5:302018-10-14T20:25:49+5:30
शौचास जात असताना जबरदस्तीने शेतात नेऊन चिनावल, ता.रावेर येथील एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी यशवंत सुरेश इंगळे (रा.चिनावल, ता.रावेर) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शून्य क्रमांकाने हा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील तरुणी अत्याचारातून गर्भवती
जळगाव : शौचास जात असताना जबरदस्तीने शेतात नेऊन चिनावल, ता.रावेर येथील एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी यशवंत सुरेश इंगळे (रा.चिनावल, ता.रावेर) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शून्य क्रमांकाने हा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चिनावल येथील एका तरुणीच्या पोटात दुखायला लागल्याने तिला आईने रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे निदान केले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार समजताच आईला धक्का बसला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सांगितले की, शौचास जात असताना यशवंत सुरेश इंगळे याने जबरदस्तीने रस्ता अडवून शेतात नेऊन बलात्कार केला होता. या प्रकाराची माहिती कोणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे पीडितेने हा प्रकार कोणालाच सांगितला नव्हता.
शनिवारी रात्री तीच्या पोटात दुखायला लागले. गावात तात्पुरत्या गोळ्या घेऊन रविवारी आईने तिला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता ती गर्भवती असल्याचे निदान झाले. जिल्हा पेठ पोलिसांनी पीडित व तिच्या आईचा जबाब घेऊन यशवंत इंगळे याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा सावदा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.