पारोळा येथे गुणवंतांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:45+5:302021-08-01T04:15:45+5:30
गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यू.एच. करोडपती होते. ...

पारोळा येथे गुणवंतांचा गुणगौरव
गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यू.एच. करोडपती होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बडगुजर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, तसेच इंग्लिश मीडियमचे प्राचार्य श्रीकांत पाटील हे होते. यात शंभरपैकी शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या मंथन सचिन बडगुजर, पीयूष हेमंतकुमार पाटील, संतनू अजय दाणेज, तसेच ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे प्राजक्ता सूर्यवंशी, सौरभ चांदवडे, गुंजन कुंभेकर, प्राची पाटील, चिन्मय नितीन विसपुते, ऋतुजा अधिकार पाटील, साक्षी योगेश येवले, अनुराग दिलीप ठाकरे या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राजक्ता सूर्यवंशी व गुंजन कुंभेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व्ही.एन. पाटील यांनी केले तसेच आभार दीपक भावसार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.