पोलिसांचा खबऱ्या ते अट्टल चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:04 PM2019-11-19T21:04:10+5:302019-11-19T21:06:33+5:30

बेवारसचा शिक्का लागल्याने निवडला चोरीचा मार्ग : आईचे निधन, वडीलांनी सोडली साथ

 Police tidings to the unthinkable | पोलिसांचा खबऱ्या ते अट्टल चोरटा

पोलिसांचा खबऱ्या ते अट्टल चोरटा

Next

जळगाव : माता काय असते..हे समजण्याच्या आतच तिने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर पित्याने दुसरे लग्न करुन पालकत्वाची जबाबदारी सोडली. त्यामुळे आजीने पालन पोषण केले. आठवीत शिक्षण घेत असताना आजीचेही निधन झाले. यानंतर पालन पोषण करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे बेवारसचा शिक्का लागला. जगण्यासाठी विकास उर्फ विक्की चंद्रकांत साळुंखे (२५, रा. कंडारी, ता. भुसावळ) हा तरुण पोलिसांचा खबºया बनला नंतर थेट गुन्हेगारीचा शॉर्टकट वापरुन काही दिवसातच सराईत चोरटा बनला.
विक्की याला शनी पेठ पोलिसांनी गेल्या आठवड्यात डी.जे.च्या वाहनातील एम्ल्पीफायर चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भुसावळातील मित्राच्या माध्यमातून त्याने एम्ल्पीफायर विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला. चौकशीत त्याने तीन दुचाकी चोरी केल्याचेही निष्पन्न झाले. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विक्कीकडून चोरीच्या दुचाकी घेणाºया इसरा वली अहद शेख (२५, रा. चिनावल ता.रावेर) याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
सदाशिव नगरातील मयुर रमेश सावदेकर यांच्या मालकीच्या डी.जेच्या वाहनातील तीन एम्लिफायर लांबविल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी संशयित विकास ऊर्फ विक्की यास मुद्देमालासह अटक केली आहे. तो आता न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. आता दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात विक्की यास शनिपेठ पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले.

मामाच्या मुलामुळे पहिल्यांदाचा चोरली सुरतहून दुचाकी
रावेर तालुक्यातील चिनावल येथे विक्की याचा मामेभाऊ बंटी कोळी वास्तव्यास आहे. आजीच्या निधनानंतर विक्की काही दिवस बंटीसोबत सुरत येथे वास्तव्यास होता. विक्कीने पहिल्यांदा बंटीसोबत सुरत येथून दुचाकी चोरली. ही दुचाकी बंटीच्या ओळखीतून चिनावल येथे इसररा वलीअहद शेख याला विक्री केली होती. याच माध्यमातून विक्कीची चोरीची दुचाकी घेणारा इसररा याच्याशी परिचय झाला होता.

पोलिसांच्या मर्यादा ओळखल्या
विक्की हा भुसावळ येथे रहात असताना तेथील पोलिसांच्या संपर्कात आला. पोलिसांनी सांगितलेली कामे करु लागला. पुढे जावून तो पोलिसांचा खबºया झाला. त्याच्या माध्यमातून भुसावळात पोलिसांनी अनेक चोरी, घरफोडी व इतर गुन्हे उघडकीस आणले. पुढे जावून तो थेट गुन्हेगारीत उतरला. सतत पोलिसांच्या संपर्कात असल्याने त्याला पोलिसांच्या मर्यादांची जाणीव आहे, त्याचाच फायदा उचलून तो गुन्हेगारी करीत असल्याचे शनी पेठ पोलिसांनी सांगितले.

जळगावातून दोन, अमळनेरातून एक दुचाकी चोरली
1 विक्की पाच वर्षाचा असताना आईचे निधन झाले होते. भुसावळात लहानाचा मोठा झाला. त्यानंतर भुसावळ सोडल्यानंतर आजीचे घर विक्कीने भाड्याने देवून तो जळगावातील धनाजी परिसरात आला. याठिकाणी तो वृध्द दाम्पत्याच्या घरी सहा हजार रुपये महिने भाडे करारावर वास्तव्यास होता. याच परिसरातील नागरिकांशी त्याने ओळखी केली. ओळखीतून मामा, मामी असे नातेही बनविले. सात महिन्यापासून तो याचठिकाणी राहतो. यादरम्यान विक्कीने राहत असलेल्या परिसरातून प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरल्या. यानंतर अमळनेर येथून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी केली. या दुचाकी त्याने मावसभावामुळे संपर्कात आलेल्या इसररा वलीअहद शेख याला विकल्याची माहिती दिली.

पोलिसांनी लावला छडा
2 पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील, परिस जाधव, संदीप पाटील, अमित बाविस्कर, अभिजित सैंदाणे, गणेश गव्हाळे, नितीन बाविस्कर, अमोल विसपुते, मुकूंद गंगावणे, राहुल घेटे, अनिल कांबळे, राहुल पाटील, किरण वानखेडे, अखलाख शेख, मनोज येवुलकर यांच्या पथकाने चिनावलहून इसररा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडूनही चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील एक दुचाकी कोणत्या ठिकाणाहून चोरली हे निष्पन्न झाले नसून तपासात ते समोर येणार आहे.

सुरतला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद
3 सुरत येथे दुचाकी चोरीचा प्रकारसीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. याप्रकरणात बंटी कोळी व विक्की साळुंखे यांना गुजरात पोलिसांनी तसेच तेथील नागरिकांनी चांगलेच बदडले होते. यादरम्यान बंटीने दुचाकी परत करतो, गुन्हा दाखल करु नका अशी विनवणी केली होती. दहा हजारात रुपयात बंटीने ही दुचाकी इसररा यास विक्री केली होती. मात्र गुन्हा दाखल होवू नये म्हणून बंटीने इसररा यास १४ हजार रुपये देवून पुन्हा दुचाकी परत घेतली व दुचाकी सुरत जावून परत केली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान विक्कीने सुरत येथून अनेक दुचाकी चोरल्याचा संशय असून त्याचा तपास सुरु आहे.
 

Web Title:  Police tidings to the unthinkable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.