जळगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 12:40 IST2018-04-18T12:40:16+5:302018-04-18T12:40:16+5:30
गुन्हा दाखल

जळगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचे धाडसत्र
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १८ - सम्राट कॉलनीला लागून असलेल्या लक्ष्मी नगरात एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री नऊ वाजता धाडसत्र राबवून चार जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन हजार १० रुपये जप्त करण्यात आले. मुकेश दिलीप पाटील (वय २९ रा.वाघ नगर, जळगाव), राहूल सुरेश पाटील (वय २६ रा.लक्ष्मी नगर, जळगाव), अरुण देविदास शिंदे (वय ३०, रा.जुनी सम्राट कॉलनी, जळगाव) व मारोती जंगलु नेरकर (वय ७२ रा.सम्राट कॉलनी, जळगाव) या चौघांना अटक करण्यात येऊन त्यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्या पथकाने कारवाई केली.