मुलीच्या अपहरणाच्या अफवेने पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:08 IST2019-08-03T20:08:50+5:302019-08-03T20:08:54+5:30
अमळनेर : शहरात भर दुपारी तहसील कार्यालयासमोरून एका लहान मुलीला रिक्षात घालून पळवून नेल्याची चर्चा ३ आॅगस्ट रोजी सर्वत्र ...

मुलीच्या अपहरणाच्या अफवेने पोलिसांची दमछाक
अमळनेर : शहरात भर दुपारी तहसील कार्यालयासमोरून एका लहान मुलीला रिक्षात घालून पळवून नेल्याची चर्चा ३ आॅगस्ट रोजी सर्वत्र सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंत कोणाचीही तक्रार न आल्याने ही अफवाच ठरली.
३ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरून चालकाने रस्त्याने चालणा-या १० वर्षीय मुलीला रिक्षात ओढून पळवून नेल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांची धावपळही झाली. पोलिसांनी चौफेर शोध घेतला. पोलीस निरीक्षक मोरे यांनी आपल्या वाहनातून धुळे रस्त्याकडे अमळनेर तालुक्याची हद्द चोपडाई कोंढावळ गावापर्यंत मागोवा घेतला. मात्र, सदर चर्चेबाबत काहीच आढळून आले नाही. त्यामुळे ही मुलीच्या अपहरणाची अफवा ठरली.
कोणीतरी विनाकारण पोलिसांना त्रास देण्यासाठी ही बातमी पसरवली. पोलिसांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागला. नागरिकांमध्येदेखील भीती निर्माण झाली होती. तरी पोलीस दक्षता बाळगून आहेत.
-अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर