अवैध दारू अड्डयावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:54 IST2020-12-28T19:54:26+5:302020-12-28T19:54:43+5:30

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : १ हजार ८०० रूपयांची दारू जप्त

Police raid illegal liquor den | अवैध दारू अड्डयावर पोलिसांचा छापा

अवैध दारू अड्डयावर पोलिसांचा छापा

जळगाव : तांबापूरा-कंजरवाडा भागातील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डयावर सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी छापा मारला. या कारवाई मयूर उर्फ काल्या देविदास बागडे (२९, रा. तांबापूरा-कंजरवाडा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून १ हजार ८०० रूपयांची गावठी हात भट्टी दारू जप्त करण्यात आली आहे.
तांबापूरा-कंजरवाडा भागात मयूर बागडे हा त्याच्या घराच्या आडोश्याला अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू अड्डा चालवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकली़ यावेळी मयूर बागडे हा दारू विक्री करताना आढळून आला.पोलिसांनी त्यास अटक केली असून गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मिलिंद सोनवणे, विजय बाविस्कर, दीपक बाविस्कर, अजय चौधरी आदींनी केली आहे.

Web Title: Police raid illegal liquor den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.