अमळनेरात पोलिसांची धाड, ४५ लाख रोख, दोन किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:44 IST2020-05-19T16:07:25+5:302020-05-19T16:44:04+5:30
अमळनेरात ४५ लाख रुपये रोख रक्कम आणि दोन किलो गांजा पोलिसांनी पकडला.

अमळनेरात पोलिसांची धाड, ४५ लाख रोख, दोन किलो गांजा जप्त
संजय पाटील
अमळनेर : शहरातील खलेश्वर कांजरवाड्यात पोलिसांनी धाड टाकली. तेथे सुमारे ४५ लाख रुपये रोख आणि दोन किलो १५४ ग्राम गांजा तसेच गावठी दारू आढळून आली आहे.
डीवाय.एस.पी. राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे. एपीआय एकनाथ ढोबळे व पोलीस कर्मचार्यांनी मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक स्वरूपात एका महिलेकडे छापा टाकला असता ४४ लाख ९५ हजार ६१४ रुपये आणि सव्वादोन किलो गांजा आढळून आला आहे. तसेच गावठी दारूदेखील आढळून आली आहे. आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये सर्वात मोठी कारवाई असून, रोख रक्कम मोजणी व गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे.